Friday 24 October 2014

सुकलेला गजरा

स्वप्नात माझ्या येऊन जेव्हा तु
मला धूंडाळतो
सुकलेल्या माझ्या गजरयाचा हा मोगरा ही गंधाळतो
Modify message

Wednesday 22 October 2014

वाह रे मालीक तेरा कैसा कारोबार है?

वाह रे मालीक तेरा कैसा कारोबार है?
पैसेवाला वफादार, तो गरीब मक्कार है।
भर भर के सोना वो पत्थरो पे चढाते है,
सडको पे बैठा ये फकीर लाचार है।।

वाह रे मालीक तेरा कैसा कारोबार है?
धर्म के नाम पे खडी ईक दिवार है।
इनसानीयत बीकती है यहा चंद सीक्को मे,
एक तरफ बंदूक, दूसरी तरफ तलवार है।।

वाह रे मालीक तेरा कैसा कारोबार है?
चांद मे दाग तो सूरज मे अंगार है।
सजदे मे तेरे झूकते है रेहेम के खातीर,
तेरे खौफ से अंजान, सब घमंड मे सवार है।।

कीती गं हळवं हे तुझं माझं प्रेम.....

कीती गं हळवं हे तुझं माझं प्रेम
तु वार फुलांचा, मी तुझा न चुकलेला नेम.....

आजही आठवते ती तुझी पहीली अदा
नजर चूकवून तु लाजली, आिण मी झालो फीदा....

हवेच्या झुळकेने रेशमी केस तुझे वीखुरले
ठोका चुकला काळजाचा, पण मी ही मज सावरले.....

आताही जेव्हा ऐकतो तुझ्या पैंजणांंची रूणझूण
कसं गं सांगु सोनु, क्षणात जातो मी हरपून....

गर्व करत असेल आज तो दरपणही स्वत:वर
त्याला बघून तु लाजतेस, मी हसतो माझ्यावर....

तुला भेट देण्यास एक गुलाब वीकत घेतो
पण ते तुझ्यावर जळेल म्हणुन स्वत:च लपऊन देतो.....

कीती गं प्रेम हे व्यक्त करु, शब्द अपुरे आहेत.....
तुझ्यावीना राणी माझं जीवन अधुरं आहे.....

हातात तुझा हात घेऊन करेल या जगावर मात
वचन देतो आज, मी देईल जन्मभर साथ....

माझी आजी

होती माझी एक मैत्रीण....
बाबांनी रागावताच
मला पदराखाली घालणारी...
आईने ओरडताच तीच्यावर
रागावणारी....
माझ्यावर जीवापाड प्रेम
करणारी....

आईचे दीलखुलास गार्हाणे करण्यात
दुपार आमची रंगायची....
आईने ऐकताच तीला बहाणे
सांगण्यात मग
फजीती आमची व्हायची....

पिरक्षेत कमी मार्क मीळुन
जेव्हा व्हायची मी उदास.....
माझ्या नकळतच
कुठेतरी तीलाही व्हायचा त्रास....

जवळ मला घेऊन मग अश्रु माझे
आवरायची.....
नवीन उमेद आिण जोश देत अलगद
मला सावरायची....

लग्नापर्यंत तुझ्या मी असेल का? असं
नेहमी ती म्हणायची....
का गं आजी असं म्हणते? म्हणुन
मी ही मग चीडायची....

प्रेम आिण जीव्हाळ्याने तीच्या,
नकळतच मी मोठी झाली....
वाटा दुभंगून आपल्या, मग
मी स्वप्नांच्या दीशेने झेपावली.....

काळजी घे ग पोरी,
मी जातांना ती म्हणाली.....
तीच््या आठवणींचं गाठोडं बांधून मग
मी ही हसत नीघाली.....

दीवसांमागुन दीवस गेले,
सरल्या जुन्या आठवणी....
वीरह तीचा सहन न होता, हळूच
तरंगायचं डोळ्यात पाणी.....

संध्याकाळी त्या अचानक
बाबांचा फोन आला..
तीु आमच्यातून
कायमची हरवल्याचा मजकूर
मला मीळाला....

देवासमोर हात
जोडतांना आजही सतत वाटतं...
आपल्या माणसांना हीराऊन
देवाला तरी काय मीळतं??

शेवटी आपल्या वाटेला आलेलं दु:ख
आपणच सहन करायचं असतं.....
जगण्याची रीतंच अशी, हसून
स्वीकारायचं असतं.....

मरणे सोपे होते, जगण्याने छळले......



मरणे सोपे होते, जगण्याने छळले
निरंतर जपलेल्या एकांताला हेच माझे उत्तर आहे.....

मग ढोंगी या जगापुढे हे ढोंग तरी कसले?
माझ्या या प्रश्नाला मीच निरुत्तर आहे.....

त्यांच्या साठी जो झटला त्याला लाथांनी तुडवले
हा सडलेला राजकारणी आज समाजासाठी अत्तर आहे....

लाख पैसा कमवून त्याला गमावण्याचीच भीती असते
फाटक्या झोळीत समाधानी, हा भिकारी तरी बेहेत्तर आहे......
Modify message

अश्रु माझे लपवण्यास, मेघ सावळे झाले......

क्षण गेले निसटून 
मन गहीवरून आले
अश्रु माझे लपवण्यास,
 मेघ सावळे झाले.

ओरबाडले त्या फुलास
कत्तल त्यास केले
गंध हिरावला त्याचा
अन् काटेही कोवळे झाले.

चर्चा केली त्यांनी
सांत्वन देण्यास आले
ढोंग सारे रचण्यात
मग लोकही हळवे झाले.

वनवास झाला रामाला
भाग्य त्याचे बुडाले
नाते हरले सगळे
पण त्याचेही सोहळे झाले.

गुन्हा  केला त्यांनी
आरोपी मज ठरवले
दोष आपला नाकारण्यास
मग ते ही भोळे झाले

म्रुगजळ

ती दुनीयाच न्यारी होती. . . . . 
फक्त तुझी आिण माझी . . . . . 

शब्दांशिवायच होणारा संवाद . 
जडला होता एक अनोखा नाद. 
नुकतीच लागलेली प्रीतीची चाहूल
आिण क्षणोक्षणी होणारा आल्हाद. 

हऴुच लपुन बघणं आिण मनातच खुदकन हसणं 
स्वप्नांच्या दुनीयेत मग न कऴत हरऊन बसणं. 

विचारांमधला अलग़द होणारा स्पर्श. . . आिण अंगावर 
उठणारे शहारे. . . 
पहिल्या पहिल्या प्रीतीत आता जवऴ वाटु लागले होते 
कीनारे . . . . 

नुकतेच चढलेले प्रीतीचे हे रंग आसमंतात उधऴु लागले. 
मी न आता माझी उरली बस हेच भाव जाणउ लागले . . . . . 

मनाला लागला होता सख्या तुझाच ध्यास. 
आयुष्यातल्या एका सुंदर 
वळणावरचा चालला होता प्रवास . . . . 

दिवस आिण रात्र यांचा थांगपत्ता ही न लागता मी भान 
हरपून बसली 
हे विश्व हे जग यांची जराही तमा न बाळगता भावनेत 
सर्वस्व गमउन बसली. 

सांजवेऴ उलटुन गेलेली लक्ख अंधाराची निशा आिण संथ 
वाहणारे सागराचे पाणी अशी होती ती वेळ. . . . . 
आकाशातही जणू काही चालला होता चंद्र आिण 
चांदणीच्या प्रतीचा खेऴ . . . . . 
बंद मुट्ठीतुन वाऴु नीसटावी तशी नीसटु 
लागली होती वेऴ . . . . 
वास्तवाच्या भीषण चटक्याने जणू तुटत 
चालला होता मेऴ . . . 

पक्ष्यांच्या किलबीलाटात मग हऴुच सुर्य डोकाउ 
लागला . . . . 
स्वप्नात रमणे बरे नाही म्हणुन जणु माझ्यावरच हसू 
लागला . . . . 

गाढ झोपेतुन दचकुन जागे झाल्यागत काहीतरी झाले . . . 
स्वप्न आिण वास्तव यांच्यातले अस्पष्ट फरक आता स्पष्ट
जाणऊ लागले . . . . <3 

नजर

मनात ऊठले होते विचारांचे काहूर . . . . . सांगण्यास 
मी झाली होती अातुर . . . . . तीतक्यात 
कोणातरी दिसलं . . . . . . त्यास जरा सांगून बघाव 
म्हटलं . . . . .

अंतःकरणात दाटलेले ते शब्द ओठांवर आले. . . जणु 
काही धावपळीची पैज लागल्यापरी कानांवर जाऊन 
धडकले . . . . . 
मनानेही सोडला मग सुटकेचा श्वास. . . . 
कान आिण ओठांना  म्हणू लागला झालो रे 
आता मी बिनधास्त . . . . . .

नजर मात्र दचकली. . . . जरा घाबरली. . . 
घडलेले द्रुष्य परत चाचपून पहावे म्हणून डोऴ्यांस िवणवू 
लागली . . . . . 
डोळे ही स्मीत हास्याने नजरे कडे बघू लागले . . अगं वेडे 
घाबरतेस कशाला म्हणून तीला विचारु लागले. 

मनात विचार उठले . . ओठांनी ते व्यक्त केले, 
कानांनी ऐकले . . . आिण सगळ्यांचा साक्षीदार म्हणून 
डोळ्यांनी ते पाहीले . . . 
आपापली जबाबदारी पार पडली. . . . . आिण ज्याचे त्याचे 
कामही संपले . . . .

नजरे भोवती तरी फिरत होते शंकेचे वारे . . . . विनंती करून 
सवंगड्यांस म्हणत होती माझे ऐकुन तर घ्या सारे . . . . .

 
मुर्ख आहात रे तुम्ही तुमचे डोके आहे की खोके . 
न मला आजवर कोणी देऊ पाहीले सहजा-सहजी धोके

गैरसमजाच्या चक्रव्युहात फसले रे सारे 
हे ऐकुन जणु वाढत होते ह्रुदयाचेही ठोके 

नजर विचारी डोऴ्यांना कोण दिसले रे तुम्हाला जे 
तुम्ही देहभान हरपून बसले??? 
ओठांवर ही ओरडली, इतके स्वस्त होते का तुमचे शब्द जे
क्षणात देउन चुकले???

मग नजर फीरली मनाकडे आिण धरले त्याला धारेवर. 
भिती होती न तुला जनाची मग का सुटलास मोकाट 
वार्यावर??? 

कोण होता तो खास ज्यावर 
एकाएकी जडला तुझा विश्वास??? 
भिती नाही का तुला होशील ना एक दिवस उदास!!! 

भावनेच्या या राजनीतीत डावपेच रचले जातात... 
प्रामािणकतेला बोलीवर चढउन 
नाती विकली जातात..... 

म्हणूनच शांतता ओठांवर येते 
आपलीशी वाटणारी व्यिक्तही मग नजरअंदाज होते. 

नजर-नजरेचा चालतो असाच खेळ, 
नजर चुकली की तुटतो मेळ. 
सतत चारतात सारे का इतकी शांत असते? 
वरुन शांत असली तरी "नजर" बोलत असते. 

विरह

सांजवेऴी या रीमझीम सरी 
मंद वारा आठवणींचा पसारा 
अश्रू हे ओले, ओली ही लाट
क्षणोक्षणी बघे सख्या तुझीच वाट

अबोल हे शब्द, मनातला कहर
भावना ही आता झाल्या अनावर

परतीची तुझ्या नाही रे आस
ज़ाणुनी मन होई सतत उदास

आहे श्रावणमास
तरी वाटे भकास

मजुऴ ही किलबिल
ऐकण्यास झाली मुश्कील

विरहाने तुझ्या मीच मज रुसली
मदमस्त धुंदीत जगणारी मी . . . अडगळीत लपून बसली. 

अंतरंग

एकटा न भासु देई जीवाला, 
दीलासा देई मनाला, 
“आपल“े म्हणती तयाला. 

दु:ख येता घरी
सोडुनी िचंंता सारी
सोबतीला उभा असे दारी
तीच “मैत्री“ खरी.

गरजुवंत आज दीसला
न रक्ताचा न गोत्राचा भासला
मदतीस हात पुढे सरकावला
“माणुसकीचा“ धर्म पाळला.

शब्दांची ही श्रूंखला शब्दांपूर्तीच मर्यादीत राहीली,
काळाच्या आेघात नात्यांची परीभाषा ही बदलली.

ेेएकटेपण त्याचे कुठेतरी मज रुतले
पण दीलासा देण्यास मन हे खचले
नाते तर होते आपलेपणाचे,
पण वेळेच्या अभावी “आपलेपण“ ही चुकले...

“मीत्र“ होता जीवलग, दु:ख त्याचे सोसवेना...
सांत्वन त्याला देण्यास जीव मात्र होईना
दु:खापूढे त्याच्या स्वार्थाने मज छळले
कठोेर होते माझेच मन िवश्वासही बसेना.

गरज होती त्याला, मदतीची नजर उठली,
अहंकार होता मस्तकी नकळतच पाठ फीरवली
क्रोध असतो शत्रू म्हणे, मग का मी त्यास बळी पडली??
रक्तांची होती नाती, का होती जीवाभावाची??
शेवटी “माणुसकीही“ फोल ठरली. 

पाऊस

आज माझ्या दु:खाची चाहूल त्यास लागली, 
म्हणून डोळ्यातून नव्ह,े नभातून तो बरसला.... 

मनाची आर्त हाक मनातच मीटली, 
पण मनातून नव्हे तो ढगंातून गरजला.... 

शत्रूला झुंज देण्यास मीच माझी थकली, 
मग मला साथ देण्यासाठी तो वीजेतून कडाडला... 

एकटेपण सोबतीला होते, दूसरं नव्हतं कोणी... 
आडोशाला मज थांबऊन मग, माझ्याकडे बघून 
तो हसला.... 

एकटी समजू नकोस स्वत:ला, सोबतीस असेन 
मी.... 
नीरोप माझा घेतांना, हीतगूज तो करून गेला..... 

थंडगार सरींनी मज सूखाऊन मग, 
अलगत क्षीतीजाकडे झेपावला...... 

मी

सांगून व्यथा आपुली हळहळली मी 
मर्म त्याचे कोणी जाणलेच नाही..... 

शब्द माझे लाख घेऊन चूकले
अर्थ त्याचे कोणाला ऊलगडलेच नाही....

बघणार्याने बघीतले हसरे डोळे माझे.....
अश्रू त्याचे कोणी टीपलेच नाही....

मत्सर माझा बघून थक्क झाले सगळे,
त्या मागचा ईतीहास कोणी वाचलाच नाही....

आज कौतूक माझे करण्यात दंग झाले सगळे,
हेच का होते काल नींदक काही कळलेच ऩाही....

माझ्या कवीतेच्या मेहेफीलीत रंगले सारे....
पण भावनांचे त्या रंग कधीच हरवले, कोणी ताडलेच नाही..... 

मैत्री

क्षण हळवे वाळूपरी नीसटू लागले क्षणातच.... 
भावनांचे या भास ऊरूनी वीरू लागले
मनातच.....

हरवलेल्या वाटेवरची चीमणीपाखरं
मैत्रीच्या घरट्यात स्थीरावली होती,
पंखात आज बळ येऊनी उडू लागले क्षणातच....

अनोळखी होते शब्द जरी, मैत्रीच्या आपलेपणाने घातली साद....
काळ बदलूनी काळाच्या ओघात, ही हीतगूज ही ूहरवेल क्षणातच....

दूख त्याचे मज वाटे माझे, गरज
सांगण्याची भासली नाही कधी...
आयूष्यभर सू:ख-दूखा:चे सहभागी असू, आज
आश्वासनही देऊ लागलो क्षणातच....

वळून बघता मैत्री दीसली, समोर बघीतले
तेव्हा स्वप्ने हसली....
स्वप्नाच्यी दीशेने वाट चालू लागलो, तेव्हा वाटाही दूभंगल्या क्षणातच...... 

"अनामीका"

खामोश सी िजंदगी है, अरमान बोहोत है.... 
भीड सी बस्ती मे चलतेहे, अंजान बोहोत है..... 

ईम्तीहानोका चलताहे सीलसीला, मंजीलोका नीशान मीलता नही.... 
ख्वाहीशोका घुटताहे गला न जाने उस खुदा को कैसे दीखता नही... 

ए खुदा..... मत कर गुरुर अपनी हस्ती पर, एक दीन मेरा भी आएगा.... 
खुदकी हस्ती पर नाज करने वाले, तु खुद इस 
बंदी को दुनीयासे मीलाएगा.... 

कीस्मत भी झुकेगी मेरे आगे, माथे की लकीर भी बदलेगी... 
कल जे हसते थे मुझपे, आज उनकी नीयत बदलेगी. 

रंगीन सी दुनीया है, फीरभी बेरंग लगती है... 
चांदनी तो चांद का हीस्सा है, फीरभी अलग 
सी लगती है.... 

दीखावे की मुस्कान है... 
तनहाई मे डुबी हर एक शाम है... 

बीखरा है कई टुकडो मे ये दील... 
मगर "िजंदादीली" इस दील की पेहेचान है.... 

उरली बस हीच खंत.

गुंतलेल्या नात्याला जुंपलेले ते क्षण..... 
न कऴतच दुरावले, उरले फक्त व्रण.

अडखऴली वाट, आिण हरवल्या दीशा....
तुटणार्या नात्यांची बदलली पिरभाषा.

्अधुर्या शब्दांचे अर्थ ही चुकले....
कोमेजलेल्या फुलापिर व्यर्थ च ठरले.

आठवणीतल्या आसवांची पालवी डोऴ्यात
साठली....
वास्तवाच्या उश्णतेने नजरेतच
आटली.

रिव-कीरणांभोवती
सावली घालायची मनमुराद िगरकी...
शेवटी अंधारमयी नीशेेने
ती ही झाली परकी.

डाव रचला, फासे पडले...
तरीही अर्ध्यावर
झाला अंत....
न मीळणार्या उत्तराचे प्रश्ण उद्भवले...
उरली बस
हीच खंत. 

पण तीचे आिण माझे नाहीच जमले......

प्रेम मेहणजे compromise ऐकलं होतं जरी 
प्रेमात पडण्याची घाई झाली होती तरी.... 
experience साठी म्हणुन जरा try करावे म्टले... 
पण तीचे आिण माझे नाहीच जमले...... 

नव्या नव्या प्रेमाची जादु होती सारी... 
हातात तीचा हात आला की दुनीया ही वाटे न्यारी. 
thrill असतं यात म्हणे मीत्रांनी होते सांगीतले.. 
पण तीचे आिण माझे नाहीच जमले.... 

कधी रुसवे कधी फुगवे सहन करायचो तीचे... 
नखरे तीचे बघुन साले मीत्रही हसायचे लुच्चे.... 
मग मनवतांना तीला प्रयत्नही माझे थकले... 
तीचे आिण माझ कधीे नाहीच जमले.... 

कीतीही भांडण झाले तरी वाट बघायचो तीची 
जाम भांडली म्हणुन काय झाले शेवटी होती तर 
ती माझी 
वाट बघतांना तीची, मग डोळे ही माझे पाणावले 
पण तीचे आिण माझे कधी नाहीच जमले... 

तुझे माझे जमणार नाही, नेहमीच ती म्हणायची, 
मग जमणार नव्हतेच तर ती का रडायची?? 
जवळ तीला घेऊन डोळे तीचे पुसले... 
पण तीचे आिण माझ कधीे नाहीच जमले... 

सोडुन चाल्ली तुला, एकदा सहजच म्हणाली... 
थट्टा करत असेल ती म्हणुन मी ही नजर वळवली.. 
जाते जाते म्हणता म्हणता खरच नीघुन गेली.... 
तेव्हा लक्षात आले 
की माझी बाहुली कायमची हरवली.... 

आठवणी त्या सरल्या, प्रेम ही माझे हरले... 
पण तीचे आिण माझे शेवटी नाहीच जमले.... 

गारवा

श्रावणातल्या रीमझीम सरीत, तु आिण मी चींब भीजावे....
घट्ट मीटुनी डोळे, मीठीत तुझ्या मी देहभान वीसरावे....

शब्द होउनी मुके, मनानेच मनाशी घालावी साद...
ह्रूदयातील लहरींनी सूर छेडावे, जणू तो जीवघेणा प्रमाद....

स्मीतहास्य करूनी मी, नजरेस तुझ्या कत्तल करावे.....
हसरे ओठ बघूनी माझे, काळीज तुझे घायाळ व्हावे.....

अंतर मीटुनी श्वासातील, अंगावर शहारे फूलावे...
हवेत गारवा दाटूनी, स्पंदनात रोमांच बहरावे....

श्रावणातल्या रीमझीम सरीत, तु आिण मी चींब भीजावे...
स्पर्श होउनी तुझा मज... तू आिण मी एकरूप व्हावे.....

खरच कधीतरी मनाप्रमाणे घडावे......

खरच कधीतरी मनाप्रमाणे घडावे, 
तळ्यातल्या कमळापरी रूपवान व्हावे 
नजर माझ्यावर पडताच त्याची, मी गर्वाने 
फूलून जावे... 
लाल गर्द रंगाने माझ्या त्याला आकरषून 
घ्यावे 
पण??????? 
पण जवळ माझ्या येताच तो जरा थबकला तर?? 
चीखलाने पाय माखतील म्हणून पाऊल मागे 
वळवले तर??? 
शेवटी कमळ जरी असले तरी हेच माझ सत्य 
म्हणून स्वत:च स्वत:ला समजावे..... 

खरच कधीतरी मनाप्रमाणे घडावे 
बागेतल्या गूलाबापरी सूंदर दीसावे.... 
सूगंध माझा घेताच त्याचे भान हरपून जावे... 
गूलाबी रंगाने माझ्या त्याला भाळून 
टाकावे... 
पण?????? 
पण स्पर्ष माझ्या काट्याला होताच रक्त 
त्याचे ओशाळले तर????? 
मग रूपाने सूंदर असूनही नजर त्याने 
वळवली तर??? 
शेवटी गूलाब जरी असले तरी हेच माझं सत्य 
म्हणून स्वत:च स्वत:ला समजावे... 

खरच कधीतरी मनीप्रमाणे घडावे 
श्रावणात बहरलेल्या प्राजक्ता प्रमाणे 
मी बहरावे.... 
हवेच्या झूळके सरशी मनमूराद बागडावे... 
हसतांना मला बघून त्याने हरऊन जावे... 
पण????? 
पण स्वत:ची पालवी सोडून 
मी दूसर्यंाच्या अंगणात बहरली तर??? 
तू माझी कधी नव्हतीच म्हणून त्याने 
मला नाकारले तर???? 
शेवटी प्राजक्ता जरी असली तरी हेच माझं 
सत्य म्हणून स्वत:च स्वत:ला समजावे..... 

खरच कधीतरी मनाप्रमाणे घडावे.... 
लख्ख 
चांदण्यांचंया प्रकाशातली रातराणी म्हणून 
मी फूलावे.... 
सूगंध माझा दरवळताच त्याने मंत्रमूग्ध व्हावे... 
माझ्या नाजूक सौंदर्याला त्याने मन भरून 
बघावे. 
पण???? 
पण रात्र ऊलटून दीवस ऊजडताच 
तो मला वीसरला तर???? 
प्रकाशात माझं काही अस्तीत्वच नाही असं 
तो म्हणाला तर????? 
शेवटी रातराणी जरी असली तरी हेच माझं 
सत्य म्हणून स्वत:च स्वत:ला समजावे..... 

Saturday 18 October 2014

♥आज सोबत तो असतो पण आठवण तुझीच येते♥

तुझ्या माझ्या break up ला आज वर्ष उलटून
गेलं......
खरं प्रेम ज्याला म्हणायचो ते कधीच हरपून गेलं
त्रास तुला झाला की मन माझं दुखायचं
जमणार मला नव्हतच, पण तुला सहज जाऊ दीलं.....

आज सोबत तो असतो पण आठवण तुझीच येते
हसता हसता अचानक अश्रूंची साठवण होते....

भेट मला देण्यास तो गुलाब वीकत आणतो
गुलाब सारखी सुंदर तु असं नेहमी मला म्हणतो....
गुलाबाला त्या बघून क्षणात मी विखुरते
वहीत वाळलेल्या गुलाबाकडे एकटक बघत बसते......

हात माझा हातात घेऊन तो तासनतास बोलत
असतो.....
नजरेत तुझ्या दुसराच कोणीतरी, असं गमतीत बोलून बसतो.....
अक्कल कशी नाही रे तुला म्हणून मी ही त्याला रागावते....
खोट्या रागाचा आव आणून नजरेतच
तुला लपवते.....

मागे वळून बघताना मी तुझ्यात मला शोधते
शोधता शोधता स्वतःला परत तुझ्यात हरवते
हरवलेली मला बघून हाक त्याची येते
आज सोबतीला तो असतो, तरी आठवण तुझीच
होते......

Friday 17 October 2014

विदर्भ कट्टा

राजे रजवाडे आणि भोसल्यांची शान
भारताच्या केंद्रबींदूचा मीळाला ज्याला मान
आॅरेंज सीटी म्हणून जग ज्याला ओळखतं
असं हे आमचं नागपूर महान....

झर झर वाहतो इथे पाण्याचा झरा
विदर्भाचे स्वर्ग म्हणजे आमचा चिखलदरा....
हीरवा शालू नेसलेले हे आमचे मेळघाट
तर अमरावती त शोभतो अंबादेवीचा थाट.....

शेगावी इथे वसते गजानन माऊली
साक्षात भोळ्या विठोबा ची सावली
अहिंसेचा धडा देण्यास महात्मा जीथे अवतरले
असे हे वर्धा जिल्ह्याचे सेवाग्राम भले.....

दुर्मिळ प्राण्यांनी सजलेले ताडोबा चे सुंदरवन
आचार्य विनोबा भावे यांचा पवनार येथील
आश्रम.....
कुष्ठरोग्यांचे झाले जीथे प्रेमाने संगोपन
असे हे वरोरा चे बाबा आमटें चे आनंदवन....

अकरा जिल्ह्यांनी नटलेला हा विदर्भ पट्टा
वऱ्हाडी भाषेत सजलेल्या मेहेफीलींचा कट्टा
माणसाने जपलेला माणुसकीचा संदर्भ
असा हा आमचा मराठ्यांचा विदर्भ...

अपना भी अक्सर यही हाल रेहेता है....

अपना भी अक्सर यही हाल रेहेता है
हाल क्या कहे, बेहाल ही रेहेता है.....
जवाब तो मीलजाते है दीनके उजालो मे
अंधेरो मे नजाने क्यु ये सवाल रेहेता है?

सल्तनत तो होती है बादशाहो की मुट्ठी मे
हर शक्स के मन मे यही खयाल रेहेता है
आज मीलजाए इस फकीर को हुकूमत
क्या ऐसा भी कोई महाल रेहेता है?

बटजाते है दुनिया वाले धर्म के नाम से
पर खून तो सबका लाल ही रेहेता है
फीर क्यु मचा है ये कोहराम ईनसानो मे?
दील मे दबा अब यही मलाल रेहेता है......

विठु माऊली



मुर्ती माझ्या विट्ठलाची
माऊली या जगाची
एक वार क्रुपा करूनी
ऐक हाक या लेकराची...

भेटीस तुझ्या पांडूरंगा
जीव माझा आतुरला
दर्शनावाचून तुझ्या
पूर लोचनास आला....

पोशींदा या जगाचा
विठू माझा कैवारी
ओढ तुझी लागुनी
अनवाणी नीघाली ही वारी....

कुठवर रे विट्ठला....
मी कीमया तुझी वर्णावी??
दर्शन दे रे देवा....
मी कीती वाट पहावी??

विठुला माझ्या बघताच
आज वाहील्या या मंजिरी
भेट तुझी घेण्यास
मी आलो या पंढरी....

सावळे हे रूप पहाताच
हरिनामाचा गजर झाला....
अवघी पंढरी ही दुमदुमली
जगण्यास माझ्या अर्थ आला...

मेरी तो नीक्कल पडी....;-)

चेहऱ्यात तीच्या दीसायची कधी करीना तर
कधी राणी
नव्या नव्या प्रेमाची सुरू
झाली होती कहाणी.

impress तीला करण्यासाठी कधी शाहीद
बनलो तर कधी रणबीर,
मात्र नजर तीची वळताच
व्हायचो मी बीळातला उंदीर.:-(

कट्यावर सहज एक मात्र म्हणाला.....
आयला ही बघ चीकनी....
थोबाडीत खेचून दम त्याला दीला, म्हटले
वहीनी आहे तुझी वहीनी >_<

item पटवण्यासाठी रोज रोज केली न
झेपणारी style....
तेव्हा कुठे पोरीने दीली एक गोड smile... ;-)

green signal मीळाला भाऊ, म्ह्टले आता try
मारावे
पहील्या वहील्या लफड्याचा प्रश्न,
साला propose तरी कसे करावे? :O

हिम्मत करुन तीच्या समोर गेलो, म्हटले I love you
भूवया उंचाउन रागात म्हणाली काय? Who are
u?? :O

पोरींचे नखरे मोठे, म्हटलं करत असेल ही गम्मत....
हात तीचा हातात घेऊन म्हटले, अग
राणी तुझी माझी तर आयुष्य भराची संगत.

दोन पावलं पुढे सरकावत नजर
तीची माझ्या नजरेला भीडली,
हातातला हात तीने सोडवला,
माझीही पापणी मीटली.

पोरगी जवळ येताच item
पटल्याची खात्री झाली....
पण आनंदावर वीरजण तेव्हा पडले, जेव्हा तीने
सट्टकीनी कानाखाली वाजवली :-( :'(

दचकुनच डोळे ऊघडले म्हटले काय झाले
राणी?? :O
पायातली चप्पल हातात घेऊन म्हणाली,
राणी नाही मेल्या झाशीची राणी >_<

चार शीव्या हाणून तीने केले मला दंग
म्हटले जीला गुलाब समजलो, ती तर
नीघाली निवडुंग :O :'(
पोरीचा लफडा बेकार, ऐकलं होतं जरी......
प्रेमित पडण्याची घाई झाली होती तरी......

मजनु, रांझा, रोमीओ... हे पोरीच्या नादातच
मेले.
बरे झाले देवा, माझ्यावर तसे दीवस नाही आले.

प्रेमभंगाच्या दुःखातुन कसा बसा सावरलो.
हसायचं वीसललोच होतो, पण पुन्हा हसु
लागलो.

प्रेमाच्या दीशेने आता जायचे नाही म्हणून
मार्ग सारे बदलले
वाट नीघेल तीकडे आयुष्य हे धावत सुटले.

दीवसा मागे दीवस गेले सरल्या जुन्या आठवणी
कधी काळी आठवण नीघालीच तर हुळूच यायचं
डोळ्यात पाणी.

असंच बसलो होतो एकांतात,
विचारही नव्हते काही डोक्यात.....

तीतक्यात दुरूनच गवसली एक सावली.....
तीच्याकडे बघताच, त्यात
ऐश्वर्या आणि दीपीका दीसू लागली  :-D ;-) :-)

आनंदाच्या भरात मग जोरात मारली उडी.....
स्वतःशी जरा पुटपुटलो..... हीच ती....
मेरी तो नीक्कल पडी.....:-) :-D :-) ★★★