सांजवेऴी या रीमझीम सरी
मंद वारा आठवणींचा पसारा
अश्रू हे ओले, ओली ही लाट
क्षणोक्षणी बघे सख्या तुझीच वाट
अबोल हे शब्द, मनातला कहर
भावना ही आता झाल्या अनावर
परतीची तुझ्या नाही रे आस
ज़ाणुनी मन होई सतत उदास
आहे श्रावणमास
तरी वाटे भकास
मजुऴ ही किलबिल
ऐकण्यास झाली मुश्कील
विरहाने तुझ्या मीच मज रुसली
मदमस्त धुंदीत जगणारी मी . . . अडगळीत लपून बसली.
मंद वारा आठवणींचा पसारा
अश्रू हे ओले, ओली ही लाट
क्षणोक्षणी बघे सख्या तुझीच वाट
अबोल हे शब्द, मनातला कहर
भावना ही आता झाल्या अनावर
परतीची तुझ्या नाही रे आस
ज़ाणुनी मन होई सतत उदास
आहे श्रावणमास
तरी वाटे भकास
मजुऴ ही किलबिल
ऐकण्यास झाली मुश्कील
विरहाने तुझ्या मीच मज रुसली
मदमस्त धुंदीत जगणारी मी . . . अडगळीत लपून बसली.
No comments:
Post a Comment