Wednesday, 22 October 2014

अंतरंग

एकटा न भासु देई जीवाला, 
दीलासा देई मनाला, 
“आपल“े म्हणती तयाला. 

दु:ख येता घरी
सोडुनी िचंंता सारी
सोबतीला उभा असे दारी
तीच “मैत्री“ खरी.

गरजुवंत आज दीसला
न रक्ताचा न गोत्राचा भासला
मदतीस हात पुढे सरकावला
“माणुसकीचा“ धर्म पाळला.

शब्दांची ही श्रूंखला शब्दांपूर्तीच मर्यादीत राहीली,
काळाच्या आेघात नात्यांची परीभाषा ही बदलली.

ेेएकटेपण त्याचे कुठेतरी मज रुतले
पण दीलासा देण्यास मन हे खचले
नाते तर होते आपलेपणाचे,
पण वेळेच्या अभावी “आपलेपण“ ही चुकले...

“मीत्र“ होता जीवलग, दु:ख त्याचे सोसवेना...
सांत्वन त्याला देण्यास जीव मात्र होईना
दु:खापूढे त्याच्या स्वार्थाने मज छळले
कठोेर होते माझेच मन िवश्वासही बसेना.

गरज होती त्याला, मदतीची नजर उठली,
अहंकार होता मस्तकी नकळतच पाठ फीरवली
क्रोध असतो शत्रू म्हणे, मग का मी त्यास बळी पडली??
रक्तांची होती नाती, का होती जीवाभावाची??
शेवटी “माणुसकीही“ फोल ठरली. 

No comments:

Post a Comment