Wednesday, 22 October 2014

मी

सांगून व्यथा आपुली हळहळली मी 
मर्म त्याचे कोणी जाणलेच नाही..... 

शब्द माझे लाख घेऊन चूकले
अर्थ त्याचे कोणाला ऊलगडलेच नाही....

बघणार्याने बघीतले हसरे डोळे माझे.....
अश्रू त्याचे कोणी टीपलेच नाही....

मत्सर माझा बघून थक्क झाले सगळे,
त्या मागचा ईतीहास कोणी वाचलाच नाही....

आज कौतूक माझे करण्यात दंग झाले सगळे,
हेच का होते काल नींदक काही कळलेच ऩाही....

माझ्या कवीतेच्या मेहेफीलीत रंगले सारे....
पण भावनांचे त्या रंग कधीच हरवले, कोणी ताडलेच नाही..... 

No comments:

Post a Comment