Wednesday, 22 October 2014

अश्रु माझे लपवण्यास, मेघ सावळे झाले......

क्षण गेले निसटून 
मन गहीवरून आले
अश्रु माझे लपवण्यास,
 मेघ सावळे झाले.

ओरबाडले त्या फुलास
कत्तल त्यास केले
गंध हिरावला त्याचा
अन् काटेही कोवळे झाले.

चर्चा केली त्यांनी
सांत्वन देण्यास आले
ढोंग सारे रचण्यात
मग लोकही हळवे झाले.

वनवास झाला रामाला
भाग्य त्याचे बुडाले
नाते हरले सगळे
पण त्याचेही सोहळे झाले.

गुन्हा  केला त्यांनी
आरोपी मज ठरवले
दोष आपला नाकारण्यास
मग ते ही भोळे झाले

No comments:

Post a Comment