Wednesday, 22 October 2014

मरणे सोपे होते, जगण्याने छळले......



मरणे सोपे होते, जगण्याने छळले
निरंतर जपलेल्या एकांताला हेच माझे उत्तर आहे.....

मग ढोंगी या जगापुढे हे ढोंग तरी कसले?
माझ्या या प्रश्नाला मीच निरुत्तर आहे.....

त्यांच्या साठी जो झटला त्याला लाथांनी तुडवले
हा सडलेला राजकारणी आज समाजासाठी अत्तर आहे....

लाख पैसा कमवून त्याला गमावण्याचीच भीती असते
फाटक्या झोळीत समाधानी, हा भिकारी तरी बेहेत्तर आहे......
Modify message

No comments:

Post a Comment